महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस अत्याचार : वर्ध्यात सामाजिक संघटनांचे आंदोलन, पीडितेला न्याय देण्याची मागणी - Hathras incident Wardha Protest

योगी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याऐवजी योगी सरकार त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

वर्ध्यात सामाजिक संघटनांचे आंदोलन
वर्ध्यात सामाजिक संघटनांचे आंदोलन

By

Published : Oct 1, 2020, 5:38 PM IST

वर्धा- उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध म्हणून सामाजिक संघटनांनी वर्ध्यात आंदोलन केले. काल सायंकाळी महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यात योगी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद याना निवेदन देण्यात आले.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

उत्तर प्रदेश हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करत तिच्या मानेचे हाड मोडण्यात आले. या घटनेनंतर मंगळवारी तिचा मृत्यू झाला. यात योगी सरकारच्या राज्यात मुलीच्या कुटुंबीयांना घरात कोंडून बळजबरीने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण भारतातून संताप व्यक्त होत आहे. योगी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याऐवजी योगी सरकार त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारीसुद्धा उपस्थित होत्या. मनोज चांदूरकर, श्रीकांत बाराहाते, इकराम हुसेन, सुधीर पांगुळ यासह आदी जण उपस्थित होते.

हेही वाचा-ई टीव्ही भारत विशेष : वर्ध्यात भंगार साहित्यातून साकारले महात्मा गांधी अन् विनोबांचे शिल्प

ABOUT THE AUTHOR

...view details