वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे मध्यरात्री विवाहिता गाढ झोपेत असताना काहीतरी चावल्याचे लक्षात आले. विवाहित महिलेने पतीला ही बाब सांगितली. लागलीच रुग्णवाहिका बोलावली. यावेळी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. नंदा भास्कर पाटील, असे मृतक महिलेचे नाव नाही.
कोरा येथील नंदा भास्कर पाटील (वय ३६ ) यांना झोपेतच सर्पदंश झाला. काही वेळातच त्यांच्या पायाला वेदना होत असल्याने काही तरी चावल्याचा भास पती भास्कर पाटीलना सांगितले. यावेळी त्यांच्या पतीने रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच वाटेतच मुत्यु झाला. डॉक्टरांनी विवहितेला मृत घोषित केले.