महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक - wardha

हिंगणघाट शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. शहरातील तहसील कार्यलयासमोर कार मधून गोळीबार झाल्याची तक्रार पोलिसात सायंकाळी देण्यात आली आहे. यात हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अवी उर्फ अविनाश नवरखेडे (रा. शास्त्रीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक

By

Published : Sep 2, 2019, 4:13 AM IST

वर्धा- हिंगणघाट शहरात मागील काही काळापासून गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. शहरातील तहसील कार्यलयासमोर कार मधून गोळीबार झाल्याची तक्रार पोलिसात सायंकाळी देण्यात आली आहे. यात हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अवी उर्फ अविनाश नवरखेडे (रा. शास्त्रीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट शहरात टोळीयुध्द, भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक
हिंगणघाट शहरात गुन्हेगारांमध्ये टोळीयुध्द सुरू आहे. यातूनच हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. रजनीश देवतळे हा शहरातील तहसील कार्यालय परिसरातून जात असताना अविनाश याने कारमधून जातांना पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. रजनीश देवतळे यांनी सायंकाळी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अविनाश याला ताब्यात घेतते आहे. प्राथमिक चौकशीनंतर कार या भागातून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बंदूकीतून गोळीबार झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नाही. पुढील तपासात याचा उलगडा होईल, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details