वर्धा : जिद्दीला प्रयत्नांची साथ असेल तर काहीही अशक्य आहे, असे म्हणतात. आजकाल तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेतात. मात्र, नोकऱ्या मिळत नसल्याने ते निराश होऊन चुकीच्या मार्गाला लागतात. तर काही संघर्ष करीत पर्याय निर्माण करुन उंच आकाशी झेप घेतात. अशीच एका तरुणीची गोष्ट आहे. ती उच्च शिक्षित असुनही तीने नोकरी सोडत वेगळा मार्ग निवडला.
नोकरी सोडण्याचे केले धाडस : अशीच कहाणी आहे एका उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणीची. ती वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद ह्या ग्रामीण भागातील तालुक्यामध्ये एका गावात राहते. तीचे नाव शुभांगिनी अजय राजस असे आहे. शुभंगीनीचे शिक्षण एमटेक आयटीमध्ये झालेले आहे. तसेच त्या PHD करत असुन त्यांनी या अगोदर प्राध्यापकाची नोकरी सुद्धा केलेली आहे. परंतु नोकरीमध्ये तीळ मात्र, रस नसलेल्या शुभांगि यांच्या डोक्यामध्ये काहीतरी व्यवसाय करण्याचे चालू होते. अशातच त्यांना एक मुलगी झाली. मुलगी सांभाळून नोकरी करणे त्यांना अवघड जाऊ लागले. परंतु त्यांनी धीर सोडला नाही. आपल्या कामांमध्ये सातत्य ठेवत, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरुवात करायला सुरुवात विचार केला.
व्यवसायाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद :यामध्ये त्यांना त्यांच्या आईने, डॉक्टर असलेल्या भावाने मोठी मदत केली. शुभांगिनी यांना स्वयंपाक करण्यामध्ये जास्त रस असल्याने त्यांनी स्वतःचे आपले यूट्यूब चैनल सुरू केले. त्याच्यावर विदर्भातील प्रसिद्ध व्यंजने जे आधुनिक काळामध्ये लोक पावत चाललेले आहे अशा व्यंजनांना करायला सुरुवात केली. ते व्यंजन नागरिकांपर्यंत पोहोचवायला youtube च्या माध्यमातून सुरुवात केली. यामुळे त्यांच्या या व्यवसायाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद यायला लागला.