महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निर्यातबंदी मागे घेण्याच्या निवेदनासह खासदारांना कांदा भेट - खासदार रामदास तडस यांना निवेदन

शेतकरी संघटनेने घोषणाबाजी करत कांदा भेट देऊन खासदार तडस यांना निर्यातबंदी उठवण्यासाठी निवेदन दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष घालावे. निर्यात बंदी उठवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.

वर्धा
वर्धा

By

Published : Sep 24, 2020, 8:14 PM IST

वर्धा- कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने खासदार रामदास तडस यांच्या घरापुढे आंदोलन केले. सुरुवातीला राखरांगोळी आंदोलनाचा इशारा दिला, पण मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने आंदोलनाचे स्वरुप बदलले. यावेळी शेतकरी संघटनेने घोषणाबाजी करत कांदा भेट देऊन खासदार तडस यांना निर्यात बंदी उठवण्यासाठी निवेदन दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष घालावे. निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. कांद्याला आतापर्यंत कवडीमोल भाव मिळत होता. पण, आता चांगला भाव मिळायला लागला असताना निर्यात बंदी घोषित केली.

शेतकरी संघटनेचे वर्ध्यात आंदोलन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हा विश्वासघात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासह संसदेत शेतकरी विरोधी विधेयक पास करण्यात आले. या विधयेकालाही विरोध करण्यात आला. निर्यातबंदी तत्काळ हटवण्यात यावी. वेळ पडल्यास पंजाबच्या अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याप्रमाणे राजीनामा देऊन कठोर भूमिका खासदार म्हणून घ्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने खासदार तडस यांच्याकडे केली.

हेही वाचा -...अखेर सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना व्हावे लागले पायऊतार

कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच कांद्यावरील निर्यातबंदी उठवली जाईल, असेही आंदोलकांना आश्वस्त केले. यावेळी कांदा भेट देऊन निवेदन देण्यात आले. याशिवाय शेती व्यापारात सरकारने हस्तक्षेप करू नये. चुकीच्या पद्धतीने निर्यात धोरण राबवत शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, असेही शेतकरी संघटनेने निवेदन देताना मागणी केली. यावेळी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मधुसूदन हरणे जिल्हाध्यक्ष उल्हास कोटकर, युवा अध्यक्ष रवींद्र राऊत यासह सचिन डाफे, महादेव गोहो, हेमंत वकारे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश मुटे यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -वर्धेकरांनो सावधान..! अजून हर्ड इम्युनिटी तयार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details