महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांधीजींच्या 150 व्या जयंतीदिनी सेवाग्रामच्या भूमीत होणार सेवा दलाची बैठक - राष्ट्रीय सेवा दल बैठक सेवाग्राम बातमी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचा अविभाज्य भाग म्हणून सेवा दलाची ओळख आहे. याच सेवा दलाची बैठक सेवाग्राम येथे होणार आहे. तसेच वर्धा येथे २ ऑक्टोबरला भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवाग्राम

By

Published : Oct 1, 2019, 8:41 AM IST

वर्धा - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचा अविभाज्य भाग म्हणून सेवा दलाची ओळख आहे. याच सेवा दलाची बैठक सेवाग्राम येथे होणार आहे. तसेच वर्धा येथे २ ऑक्टोबरला भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने माहिती सांगितली जात आहे. या बैठकीच्या सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहतील, मागील काही दिवसांपासूनच्या राजकीय अज्ञातवासातून ते बाहेर येतील अशीही चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे.

सेवाग्राम आश्रम, वर्धा


मात्र, राहुल गांधी नसले तरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - गांधी १५० : बापूंचे 'सेवाग्राम' ठरतंय पर्यटन केंद्र!

असा असणार सेवा दलाचा कार्यक्रम -

यावेळी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन करून एक पदयात्रा सकाळी १० वाजता बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून काढण्यात येईल. याच सेवाग्राम ते वर्धा मार्गावर असलेले हुतात्मा स्मारक, आदर्शनगर, वर्धा येथे यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक रत्नाकर सभागृह, म्हाडा कॉलनीसमोर, सेवग्राम रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा -गांधी १५० : ओडिशाच्या 'हम्मा' गावातील मिठाचा सत्याग्रह...

या पदयात्रेत सेवादलाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गणवेशात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी केले आहे. राष्ट्रीय सेवा दलाची स्थापना संघाच्या 2 वर्षापूर्वी झाली. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या कामात शिस्त यावी यासाठी 1923 ते जानेवारी 1924 दरम्यान नारायण हार्डीकर यांनी याची स्थापन केली होती. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात मदतीला पाठीशी राहणारी संघटना म्हणून देखील सेवा दलाकडे पाहिले जाते. याचीच बैठक गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे मागील पाच वर्षांत झालेली काँग्रेसची वाताहत यातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा - स्वीडनच्या ग्रेटाच्या आंदोलनाला सेवाग्रामच्या आनंद निकेतनचा हातभार

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी हे राजकीय अज्ञातवासात असल्याचे बोलले जात आहे. यात महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मैदानात उतरतील अशी चर्चा होती. पण जयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचली असताना, दौरा न आल्याने तो रद्द झाला असल्याचे बोलले जात आहे. ज्याप्रमाणे अधिकृत दौरा आला नव्हता मात्र, चर्चा होती त्यामुळे दौरा होणार नसल्याचे सुद्धा लक्षात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 2 दिवसात काहीच होणार नाही यावरून दौरा रद्दला एक प्रकारे दुजोरा मिळत आहे.

हेही वाचा - गांधी १५० : चिराला-पिराला आंदोलन, आणि गांधीजींची तुटलेली काठी...

ABOUT THE AUTHOR

...view details