महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात ट्रॅक्टरला अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी - pulgaon- wardha highway accidents

पुलगाव-वर्धा महामार्गावरील मलकापूर बोदड जवळ ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे.

severe accident on pulgaon-wardha highway
पुलगाव-वर्धा महामार्गावरील मलकापूर बोदड जवळ ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे.

By

Published : Jan 14, 2020, 8:55 AM IST

Updated : Jan 14, 2020, 12:35 PM IST

वर्धा - पुलगाव-वर्धा महामार्गावरील मलकापूर बोदड जवळ ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी आहे.

पुलगाव-वर्धा महामार्गावरील मलकापूर बोदड जवळ ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे.

भरधाव ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली; आणि सेंट्रिंग साहित्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला आहे. राजू उर्फ शेख रियाज शेख आणि चंद्रभान शेळके अशी मृतांची नावे आहेत. तर सोहेल खान गंभीर जखमी आहे.

संबंधित ट्रॅक्टर पुलगाववरून सेंट्रिंगचे साहित्य घेऊन रात्रीच्या वेळी नागपूरला जात होता. अचानक आलेल्या वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटली. नागपूरला एका कंत्राटदाराकडे हे साहित्य पोहोचवत असल्याची माहिती आहे.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Last Updated : Jan 14, 2020, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details