महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोज स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे संजय राऊतांचा उद्योग - आशिष शेलार - मुंबई महानगरपालिका निवडणूक बद्दल बातमी

रोज स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे संजय राऊतांचा उद्योग, असल्याचे आशिष शेलार म्हणाले. भाजपा नेते आशिष शेलार वर्ध्यातील पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीसाठी आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut's business to make statements to be discussed on a daily basis, said Ashish Shelar
रोज चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे संजय राऊतांचा उद्योग - आशिष शेलार

By

Published : Jun 18, 2021, 5:30 PM IST

वर्धा -संजय राऊत यांनी आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास चमत्कार घडेल असे वक्तव्य केले. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार बोलताना म्हणाले, की रोज रोज नवीन प्रयोग करून स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी असे वक्तव्य करण्याचा उद्योग काही लोकांचा आहे. यात सामना आणि संजय राऊत हे अग्रणी असल्याचे म्हणत टोला लगावला. ते वर्ध्यात बोलत होते. भाजपा नेते आशिष शेलार वर्ध्यातील पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

रोज चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे संजय राऊतांचा उद्योग - आशिष शेलार

शिवसेनेवर निशाणा साधला -

यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधला. राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोळ नंतर संजय राऊत आणि अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ अस वक्तव्य केले. यावर शेलार यांनी शिवसेनेचा उत्तर देण्यासाठी वाट कसली बघता भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही, असे म्हणत जोरदार निशाणा साधला. गदारोळावर मंत्र्यांनी अशा पद्धतीने बोलतात पण सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेने करावे.

'लोकशाही मार्गाने आंदोलन होईल' -

रामाला आणि राम मंदिराला बदनाम करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न होत असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन होईल, ते करायचा आमचा अधिकार आहे. भाजपाचे कार्यकर्ते ते करतील सत्ताधारी त्याकरिता एवढे का घाबरतात हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

'आगामी महानगर पालिका निवडणुकीत जनता सेनेला धडा शिकवेल' -

मुंबईच्या नालेसफाईवर मनसे आता आक्रमक झाली आहे. यावरही त्यांनी भाष्य करताना म्हणाले, की मुंबई नालेसफाईचा भांडाफोड हा मनसेपूर्वी भाजपाने पहिले केला. शेलार म्हणाले स्वतः जाऊन नालेसफाईचे राऊंड घेतले. त्यात १०७ टक्के नालेसफाई कुठे झाली असा सवाल केला. मनसेने त्या विषयाला धरून योग्य भूमिका घेतली आहे. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला खरंतर लाज वाटली पाहिजे. आम्ही जनतेला किती फसवतो, पण शिवसेनेला निर्लज्जपणे सत्ता चालवायची आहे. जनतेच्या मदतीच एकही काम करायचे नाही आहे. याच पद्धतीने महानगरपालिकेचे काम चालू आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता सेनेला धडा शिकवेल असेही शेलार यावेळी म्हणाले.

'जे गरजतात ते बरसत नाहीत' -

भाजपामध्ये इन्कमनिग सुरू असताना सुनील केदार मुंबईच्या टिळक भवनावर यादी तयार होत आहे, असे म्हणाले. यावर जे गरजतात ते बरसत नाही, केदार यांच्या वक्तव्य महत्त्व देण्यासारखे नाही असेही ते म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details