वर्धा -वंचित बहुजन आघाडी कोणाशीही आघाडी करणार नाही. कारण आघाडी होऊ नये, अशा विचाराचे लोक त्यांच्या मागे उभे आहेत. आमदार येवो अथवा न येवो स्वतंत्र लढण्यात त्यांना दुसरा फायदा आहेच, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वंचितवर केली.
अबू आझमींची सरकारसह वंचित आघाडीवर टीका; म्हणाले... - Samajwadi Party
भाजपच्या मागे मोठा रिमोट कंट्रोल आहे, तो आरएसएसचा असू शकतो किंवा देशातील मोठ्या उद्योगपतींचा असू शकतो, हेच लोक आपल्या मर्जीने सरकार चालवत असल्याची टीका अबू आझमी यांनी केली.
काँग्रेसने प्रयत्न केले तरी वंचित आघाडी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे सध्या चित्र आहे. वेळ पडली तर पक्ष छोटा करावा पण धर्मनिरपेक्ष लोकांचे विभाजन होऊ नये, असा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. सरकारने जेवढ्या यात्रा काढायच्या तेवढ्या काढा, पण जनतेने यांना सत्तेत असताना काय केले, असा प्रश्न विचारायला पाहिजे. सरकार सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास असे म्हणते. मग मॉब लिंचिंगच्या घटना का थांबत नाही, याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. जनादेश यात्रेदरम्यान मोदींचे गुणगान करणारे प्रश्न मीडिया विचारणार असल्याने जनतेनेच आता त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, असेही आझमी म्हणाले.
भाजपच्या मागे मोठा रिमोट कंट्रोल आहे, तो आरएसएसचा असू शकतो किंवा देशातील मोठ्या उद्योगपतींचा असू शकतो, हेच लोक आपल्या मर्जीने सरकार चालवत असल्याची टीका त्यांनी केली. जे लोक आजपर्यंत धर्मनिरपेक्षताच्या गोष्टी करत होते, तेच लोक आता सत्तेच्या मोहापाई लोटांगण घालत भाजपत सामील होत असल्याची खंत वाटते आहे. यांचा विचार केवळ पैसा आणि सत्ता असल्याने असे लोक देशात राहिले तर देशाचे भले कसे होणार, असे देखील ते म्हणाले.