महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात नाभिक महामंडळाकडून उपोषण; लवकरच मदतीची भूमिका जाहीर करणार - सुनील केदार - Guardian minister Sunil kedar wardha

दुकाने खुले करण्याचे आदेश न दिल्याचे सांगत सुनील केदार यांनी केंद्र सरकारवर खापर फोडले. पण पुढील काळात इतर घटकांना मदत करत आहे, लवकर मदतीची भुमीका जाहीर करू, असे सुनील केदार उपोषणकर्त्यांना म्हणाले. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

Maharashtra saloon organisation
Maharashtra saloon organisation

By

Published : Jun 15, 2020, 7:19 PM IST

वर्धा - शहरातील नाभिक महामंडळाकडून आज शिवाजी चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. यावेळी महाराष्ट्र सरकार सलून व्यवसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी देऊ शकत नाही, असे सुनील केदार यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.

दुकाने खुली करण्याचे आदेश न दिल्याचे सांगत सुनील केदार यांनी केंद्र सरकारवर खापर फोडले. पण पुढील काळात इतर घटकांना मदत करत आहे, लवकर मदतीची भूमिका जाहीर करू, असे सुनील केदार उपोषणकर्त्यांना म्हणाले. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडले असताना काही व्यवसाय अनलॉकमध्ये खुले करण्यात आले. पण सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांना अद्याप परवानगी मिळाली नाही. यामुळे त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. यात दुकाने खुली करण्यासाठी महाराष्ट्र सरकार काही करू शकत नाही. पुढील 15 दिवसात महाराष्ट्र सरकार मदतीसाठी भूमिका घेईल असे सुनील केदार यांनी उपोषणकर्त्यांना आश्वस्त केले. यावेळी नाभिक महामंडळाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाद्वारे निवेदन पाठवण्यात आले.

लॉकडाऊनमूळे मागील 3 महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने नाभिक बांधव आर्थिक अडचणीत आहे. वारंवार निवेदन, शांततापूर्ण आंदोलनाद्वारे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण कोणत्याही मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही. तीन महिन्यांपासून आवकच बंद असल्याने मुलांचे शाळेचे शुल्क, दुकान व घरभाडे, वीज देयक, कुटुंबात कुणी आजारी असेल तर औषधोपचाराचा खर्च कसा करावा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नाभिक व्यावसायिकांच्या 'या' आहेत मागण्या

नाभिक समाजातील सलून, ब्युटी पार्लर दुकानदार कारागीर यांच्याकरिता स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, दरमहा 7 हजार रुपये देण्यात यावे, वीज देयक आणि घर-दुकान भाडे माफ करावे, दुकानदार, कारागीर यांना विमा सुरक्षा कवच द्यावे, सुरक्षा किट देऊन प्रतिबंधित क्षेत्र वगळता सलून दुकाने व ब्युटी पार्लर सुरू करण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ विभागीय सचिव विवेक अतकर, उपाध्यक्ष श्रीकांत वाटकर यांनी केल्या.

उपोषणस्थळी आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते निंबुपानी देण्यात आले. या उपोषण मंडळाला खासदार रामदास तडस, महिला काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, रवींद्र कोतम्बकार यांच्यासह कपडा, सराफा, किराणा व्यापारी संघाने तसेच राजकीय पक्ष आणि सामाजिक सनघटनांनी पाठिंबा दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details