महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात धावत्या वाहनाने घेतला पेट, जीवितहानी नाही - Wardha latest news

या आगीमुळे काही काळ वाहतूक विसकळीत झाली होती. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यानंतर घटनेची पुलगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.

Wardha
वर्ध्यात धावत्या ओमनीने घेतला पेट

By

Published : Jan 28, 2020, 12:42 PM IST

वर्धा- जिल्ह्यातील नाचनगाव परिसरात अचानक धावत्या ओमनीने पेट घेतला. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमाराससाईपार्कजवळ ही घटनाघडली. यामध्ये जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

धावत्या वाहनाने घेतला पेट

या ओमनीने नाचणगाव येथील युवराज कांबळे पुलगाववरून मित्रासोबत घराकडे नाचणगावला जात होते. त्यावेळी साईपार्कजवळ येताच अचानक या ओमनीने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालक युवराज कांबळे हा मित्रासोबत बाहेर पडला. पेटलेल्या कारवर लगतच्या गोडाऊनमधील पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कार जळून खाक झाली. ही ओमनी गॅसवर चालत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details