वर्धाRohit Pawar On Chandrasekhar Bawankule :‘युवा संघर्ष यात्रा’ वर्धा शहरात आल्यानंतर समीर देशमुख यांनी पुस्तक तुला केली. थोर राष्ट्रपुरुष, संत-महात्मे, महापुरुष, अशा महान व्यक्तींच्या पुस्तकांचा यामध्ये समावेश असून ही प्रेरणादायी पुस्तकं युवा संघर्ष यात्रेतील सहभागी संघर्ष यात्रींना देण्यात आली, अशी महिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. विदर्भातील अनेक समस्या आहेत. शेतकरी अडचणीत आहे. विदर्भातील अनेक नेते मंत्रिपदावर विराजमान आहेत. तसंच उपमुख्यमंत्रीही विदर्भातीलच, तरी देखील विदर्भात शेतकरी संकटात आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा अनेक समस्या राज्यात आहेत.
काय म्हणाले रोहित पवार? : शेतकरी आत्महत्या, शेतीचे नुकसान, अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण, आरोग्य विभागाची कोंडी अशा अनेक गंभीर समस्या असताना पहिल्याच दिवशी सरकारनं कॅसिनोच्या मुद्द्यावर निर्णय घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना चिमटा काढलाय. कॅसिनोच्या महत्त्वाच्या प्रश्नावर बावनकुळेंच्या अध्यक्षाची समीती नियुक्ती करून त्यांच्याकडे विधेयक पाठवा, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.