वर्धा- उरीनंतर आज हवाई दलाने केलेली कारवाई आनंद देणारी आहे. अशाच कारवाईची आम्ही वाट पाहत होतो. अशा भावना सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांनी व्यक्त केल्या. भारतीय हवाई दलाने आज पहाटेच्या सुमारास पाकव्याप्त भागातील दहशतवादी तळावर हल्ला केला. त्यानंतर चवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हवाई हल्ला : ...याच क्षणाची आम्ही वाट पाहत होतो - सेवानिवृत्त कर्नल - सर्जिकल स्ट्राईक
अशाच कारवाईची आम्ही वाट पाहत होतो. अशा भावना सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांनी व्यक्त केल्या.
मागील काही दिवसात सरकारने पाकिस्तानचा जो मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. याचे समाधान होत आहे. आज सकाळी जेव्हा हवाई दलाने केल्याल्या कारवाईची माहिती मिळाली, तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा सेवा निवृत्त सैनिकी संघटनेच्या वतीने आम्ही एकत्र येत हा आनंद साजरा केला.
मागील अनेक दिवसांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. येत्या काळात जर पाकिस्तानने हल्ला केल्यास पुन्हा उत्तर देण्यासाठी अशा कारवाई सुरू राहतील. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज झालेल्या कारवाईनंतर सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.