वर्धा- लॉकडाऊनमुळे मागील महिन्यापासून कामगारांंचा रोजगार बुडाला आहे. मजूर वर्गाची उपासमार टाळण्यासाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. तसेच सध्या एकही कोरोनाबाधइत नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. यामुळे आजपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे काही उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. बांधकाम व्यवसायाला देखील शिथिलता मिळाल्याने मजूरवर्ग देखील कामाच्या शोधात घराबाहेर पडलाय. मात्र, मजूर अड्ड्यावर कोणीही काम देण्यासाठी न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच पुन्हा परतावे लागले आहे.
मजूर अड्ड्यावर कोणीही काम देण्यासाठी न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच पुन्हा परतावे लागले आहे. शहरातील सोशालिस्ट चौकात महिनाभरानंतर मजूर अड्डा भरला होता. मात्र, हाताला काम न मिळाल्याने या मजूरांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पहिल्याच दिवशी हाताला काम न मिळाल्याने आशेने बाहेर पडलेल्या मजूरांचा हिरमोड झालाय.
मजूर अड्ड्यावर कोणीही काम देण्यासाठी न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच पुन्हा परतावे लागले आहे. आज शिथिलाता मिळाल्याचा पहिला दिवस असल्याने नागरिक सरकारी आदेशाबाबत अनभिज्ञ होते. अनेक दुकानचालक दुकासमोर येऊन उभे राहिले. दुकाने उघडायची, की नाही असा संभ्रम होता. यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता अन्य दुकानं उघडली नाहीत. जिल्ह्यातील काही उद्योगांना शिथिलता देत प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत. तसेच कमीत कमी लोकांमध्ये सर्व नियमांचे पालन करून काम करण्याच्या सुचना आहेत.
मजूर अड्ड्यावर कोणीही काम देण्यासाठी न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच पुन्हा परतावे लागले आहे. शहरात आज कृषिसह हार्डवेअर, अत्यावश्यक सुविधांसह काही हॉटेल, दुकाने सुद्धा उघडली. काही ऑटोचालक सुद्धा रस्त्यावर धावताना दिसून आले. त्यांना वाहतूक पोलिसांनी समज देत घरी पाठवले आहे. लॉकडाऊन काळातील इतर दिवसांप्रमाणे आज दुपारी एकनंतर पुन्हा रस्ते रिकामे झाले; आणि दुकाने बंद करण्यात आली.
मजूर अड्ड्यावर कोणीही काम देण्यासाठी न आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच पुन्हा परतावे लागले आहे.