महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात रेड अलर्ट, २ दिवस असणार उष्णतेची लाट - रेड अलर्ट

वर्ध्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला आहे. गेल्या ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २ दिवसांपासून तापमान ४६.५ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावले आहे.

वर्ध्यात ओस पडलेला रस्ता

By

Published : May 28, 2019, 8:05 AM IST

Updated : May 28, 2019, 8:13 AM IST

वर्धा - पुढील २ दिवस जिल्ह्याचे तापमान वाढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे रेड अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

उष्णतेमुळे वर्ध्यात ओस पडलेला रस्ता

जिल्ह्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला आहे. गेल्या ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २ दिवसांपासून तापमान ४६.५ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावले आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला, विद्यार्थिनी स्कार्फ बांधून स्वतःची सुरक्षा करीत आहेत. थोडासा थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आश्रय घेताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते ओस पडायला लागली आहेत.

Last Updated : May 28, 2019, 8:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details