जेटलींच्या निधनाने देशात पोकळी निर्माण झाली - बावनकुळे - chandrashekhar bawankule on arun jaitley passes away at AIIMS
वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित जनसंवाद बैठकी दरम्यान ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारताचे माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
वर्धा - भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. जेटली हे प्रख्यात सनदी लेखापाल, वकील यासह एक उत्तम संसदपटू राहिले आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच ते उत्तम संघटक होते. तसेच अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले असे मत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यात व्यक्त केले.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाहली श्रद्धांजली