वर्धा - रामनगर पोलिसांकडून युवकाला अटक करत देशी कट्टा जप्त केला आहे. रात्रीच्या सुमारास गुप्त माहितेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरात झडती घेऊन हा कट्टा जप्त करण्यात आला. शुभम लालसिंग ठाकूर याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात देशी कट्टा बाळगण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिन्याभरात जिल्ह्यातील ही चौथी कारवाई आहे.
वर्ध्यात युवकाला अटक, देशी बनावटीचे पिस्तूल जप्त - police seized pistol with a boy
रामनगर पोलिसांकडून युवकाला अटक करत देशी कट्टा जप्त केला आहे. रात्रीच्या सुमारास गुप्त माहितेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरात झडती घेऊन हा कट्टा जप्त करण्यात आला. शुभम लालसिंग ठाकूर याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.
वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या युवकाकडे देशी कट्टा असल्याची माहिती उघडकीस आली. या महितेच्या आधारे त्याला विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरात जाऊन शोधा शोध केली. तेव्हा घरातील सज्जावर हा देशी कट्टा भेटला. यावेळी त्याच्याकडून हा 50 हजार रुपये किमतीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला असल्याची माहिती रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक यांनी ईटीव्ही भारतला दिली. केवळ हौस म्हणून तर कधी भाईगिरी मिरवण्यासाठी युवक वर्ग गुन्हेगारीकडे वळतोय का असा सवाल उपस्थित होतो आहे.