वर्धा - यंदा कोरोनाने आर्थिक घडी बिघडून ठेवली आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच व्यवहार थांबले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्यावतीने सीसीआय जिनिंग मालक यांच्यात समन्वय साधून खरेदीचे नियोजन केले. यावर्षी जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 709 शेतकऱ्यांकडून 32 लाख 10 हजार 593 क्विंटल कापसाची कापसाची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात 2019-20 या कालावधीत 2 लाख 34 हजार 997 हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन लॉकडाऊनच्या स्थितीपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 26 हजार 641 शेतकऱ्यांकडील 23 लाख 12 हजार 798 क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. पण मार्च महिन्यात कोरोनाचे संकट सुरू होताच लॉकडाऊन झाले. यामध्ये कापूस खरेदीची प्रक्रिया थांबली. परंतु शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा प्रश्न समोर आल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली. खरेदी केंद्राचे काम राज्य शासनाने दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये कापूस खरेदीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. पण त्यासाठी 50 गाड्यांची मर्यादा ठेवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात कापूस खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांची ओरड वाढू लागली. काही ठिकाणी आंदोलन केले, कुठे ओरड तर कुठे आंदोलन करण्यात आले. यात जिनिंगमधये काम करणारा वर्ग परराज्यात निघून गेला. मजूर मिळत नसल्याने खरेदी प्रक्रियेत अडचणी वाढत गेल्याचे पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांची ओरड वाढल्याने पालकमंत्री सुनील केदार यांनी सीसीआयचे राज्याचे महाप्रबंधक यांच्याशी चर्चा करून त्यांना वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्राची पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. खरेदी वाढवण्यासाठी नव्याने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्याच्या आठही तालुका पातळीवर जाऊन परिस्थिती पाहून जिनिंग चालकांशी प्रश्न जाणून घेतला. जिथे -जिथे अडचणी येत होत्या तिथे पालकमंत्री केदार यांनी जिनिंग-प्रेसिंग मालकांशी, कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन महासंघाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यातून अतिरिक्त जिनिग संख्या वाढवून नव्याने नोंदणी करण्यात आली.
यंदाच्या हंगामात वर्धा जिल्ह्यात 32 लाख 10 हजार क्विंटल कापसाची खरेदी - कापूस शेतकरी वर्धा
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्यावतीने सीसीआय जिनिंग मालक यांच्यात समन्वय साधून खरेदीचे नियोजन केले. यावर्षी वर्धा जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 709 शेतकऱ्यांकडून 32 लाख 10 हजार 593 क्विंटल कापसाची कापसाची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात 37 खरेदी केंद्र केले सुरू...
यामध्ये वर्ध्यात -5 ,हिंगणघाट- 6, सेलू- 6, समुद्रपूर- 5, देवळी – 6, कारंजा – 3, आर्वी 6, अशी जिल्ह्यात 37 कापूस खरेदी केंदें सुरू करण्यात आली. केंद्र सुरू झाल्यावरही कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी गोडाऊनच्या उपलब्धतेचा प्रश्न उभा राहिला. यावर एमआयडीसी मधील खाजगी रिकामे गोडाऊन उपलब्ध करून देण्यात आले.
जून महिनाअखेर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या 48 हजार 63 शेतकऱ्यांकडील 8 लाख 97 हजार 804 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेला कापूस एकूण 1 लाख 74 हजार 709 शेतकऱ्यांकडील 32 लक्ष दहा लाख 593 क्विंटल कापसाची खरेदी जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. मुळात वर्धा जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी विकला जावा यासाठी प्रयत्न केले. कापूस खरेदी जूनच्या अखेरीस संपवत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.