वर्धा- जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हत्येच्या गुन्ह्यात मागील एक वर्षांपासून हा कैदी शिक्षा भोगत होता. हरी बळवंत सोनार, असे मृताचे नाव आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
वर्धा जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा मृत्यू
27 मे'च्या रात्री शौचालयाला जाताना तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हरीभाऊ बळवंत सोनारे (वय ६०, रा. पवनार) हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. 27 मे'च्या रात्री शौचालयाला जाताना तो जमिनीवर कोसळला. कारागृहात कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी आणि कारागृहाचे अधीक्षक प्रदिप इंगळे तसेच कारागृहाचे उपअधीक्षक विजय कसबे यांनी कैद्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी कैदी हरिभाऊ सोनारेला मृत घोषित केले.
शवविच्छेदन नागपूर येथे होत असल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.