वर्धा-जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा कुठलाही अंदाज नसल्याने अनेकजण पावसात भिजले. आर्वी शहरातील काही जण बाजारात अडकले.
वर्ध्यात अवकाळी पावसाची बॅटिंग, विद्युत पुरवठाही खंडित - disrupted power supply in wardha
रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने वर्धा येथे चांगलीच बॅटिंग केली. काही भागात गारपीटही झाली असल्याचे बोलले जात आहे.
रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने चांगलीच बॅटिंग केली. काही भागात गारपीटही झाली असल्याचे बोलले जात आहे. विजेच्या कडकडाटसह सुरू झालेला हा पाऊस चांगलाच बरसला आहे. विजेच्या कडकडाटमुळे विद्युत पुरवठा सुद्धा काही काळ खंडित झाला. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार आहे. सोंगलेला गहू, चणा भिजल्याने हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसान दायक ठरणार आहे.
मागील आठवड्यात ऐन धुळवडीच्या दिवशी वर्धा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गरपीटीने थैमान घातले होते. यात हिंगणघाट आणि समुद्रपूरमधील शेतपिकांचे नुकसान झाले. वर्धा तालुक्यातील वायगाव परिसरात 60 ते 70 घरांचे नुकसान झाले. मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.