महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 29, 2020, 7:41 AM IST

ETV Bharat / state

...तर भारत विश्वगुरू बनेल, प्रल्हाद सिंह पटेलांनी व्यक्त केला विश्वास

पटेल वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात बोलत होते. 'शांती और न्याय की तलाश' या विषयावर आयोजित संमेलनाच्या उद्घाटनसाठी ते वर्ध्याच्या दौऱ्यावर होते.

Prahlad Singh Patel
प्रल्हाद सिंह पटेल

वर्धा- महात्मा गांधींच्या जीवनापासून खूप काही घेण्यासारखे आहे. पण ते सर्वच घेता येईल, असे नाही. तर सर्व काही घेता येईल, यावर माझा विश्वास नाही. कारण, महात्मा गांधींच्या विचाराशी मतभेद असणारे लोक पण गांधींना मानायला लागतील आणि तसे झाल्यास गांधींचा शांतीचा मार्ग सर्वजण स्वीकारतील. त्या दिवशी भारत विश्वगुरू असल्याची मान्यता स्थापित होईल, असे मत केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले.

'शांती और न्याय की तलाश' विषयावर आयोजित संमेलन

यावेळी एकता परिषदेचे संस्थापक डॉ. पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्त्वात राजघाट ते जिनेवा निघालेली 'जय जगत' ही वैश्विक पदयात्रा हिंदी विश्वविद्यालयात मंगळवारी पोहोचली. पदयात्रेत 8 देशातील 15 आणि देशातील 25 लोकांचा सहभाग आहे.

यावेळी पटेल म्हणाले, जमीन आता फायद्याची राहिलेली नाही. नवीन पिढी शेती करायला तयार नाही. या त्रासापासून वाचायचे असेल सेंद्रीय शेतीकडे वळायला पाहिजे. पण, जैविक शेती आणि शेती यातील मिळकत पाहता कुटुंब टिकणार की नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत. हरियाणा मॉडेलने शेतकऱ्यांना संपवले, उत्पन्न विषारी झाले, जमीन खराब झाली. हरियाना ते जयपूर रोज कॅन्सर ट्रेन धावत आहेत. हे वास्तव आहे, ते नाकारले जाऊ शकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details