वर्धा- दिल्लीत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून राज्यमंत्री बच्चू कडू हे दिल्लीला रवाना होत आहेत. वर्ध्यातून प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख विकास दांडगेसह दुचाकीने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सालोड परिसरातून दुचाकीने संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
देशभरातून हळू हळू शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत आहे. यात शेतकऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्यासोबत चर्चेतून मार्ग निघत नसल्याने राज्यमंत्री बच्चू कडून यांनी प्रश्न मार्गी लागलें नाही तर आम्ही महाराष्ट्रातून सुद्धा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीत येऊ असा इशारा दिला होता. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करत आंदोलनाला सुरवात झाली आहे.
हेही वाचा - विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबीज