वर्धा - कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्व नागरिकांना मोठी भीती होती. त्याच प्रकारची भीती रूग्णसेवा देणाऱ्यांनाही होती. पण आता दुसऱ्या लाटेत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव घेऊन अनेकजण काही प्रमाणात सावरले आहेत. या सदर्भात वर्धा येथील सेवाग्राम रुग्णलायत फॉरेंन्सिक सायंसचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी काही मते नोंदवली आहेत. ते म्हणतात, 'कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना पीपीई किट न वापरता केवळ मास्क योग्य प्रकारे घालूनही उपचार केला जाऊ शकतो. तसेच हे मी स्वतः अनुभवले आहे'. यासोबत पीपीई किटमुळे डॉक्टरांनासुद्धा अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटची आवश्यकता नाही' पीपीई किटचा त्रास सहन करावा लागतो -
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णावर पीपीई किट घालून अनेक जण उपचार करतात. हे काळजी घेण्याच्या दृष्टीने नक्कीच योग्य असेल. पण यामुळे डॉक्टर, नर्स यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. यात ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे, ते रूग्ण मानसिक स्थरावर खचून गेलेले असतात. त्यांची आपल्याला काहीतरी भयंकर आजार झाला आहे, अशी समज असते. यामध्ये आपण जास्त काही न वापरता फक्त मास्क घालून रूग्णांवर उपचार केले, तर रुग्णही जास्त घाबरत नाहीत. त्यांनाही एक धीर मिळतो, असेही डॉ. खांडेकर म्हणाले. तसेच मी माझ्या १५ दिवसांच्या शिफ्टमध्ये पीपीई किट घातली नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरस हा नाकाद्वारे शरीरात जाऊ शकतो, पण.. -
कोरोना हा नाकाद्वारे शरीरात जाऊ शकतो. पण मास्क योग्य प्रकारे वापरला, तर या रोगाचा संसर्ग होत नाही. याबाबात उगाचच जास्त घाबरण्याचे कारण नाही. फक्त काळजी घेणे हा महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर नाही केला, तर रुग्णांवर उपचार करणे सोपे होते. तसेच रुग्णांशी बोलून त्यांच्यात सकारात्मकताही वाढवता येते. तसेच या काळात रुग्णाला औषधोपचारापेक्षा मानसिक आधार देण्याची गरज आहे, असेही डॉ. खांडेकर म्हणाले.
कुटुंबातील एकाला परवानगी द्या -
बहुतांश रुग्ण हे कोरोना वार्डात एकटे असतात. यात बऱ्याचदा रुग्णाची परिस्थिती गंभीर असते. स्वतःला घेऊन पाणीसुद्धा पिता येत नाही. बरेचदा रुग्ण उठूनसुद्धा बाथरूमला जाऊ शकत नाही. यामुळे रुग्ण पडणे, जखमी होणे, प्रकृती गंभीर होणे, असे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर कुटुंबातील एका व्यक्तीला रुग्णाची काळजी घेण्यासाठी रुग्णासोबत राहण्यासाची परवाणगी द्यायला हवी. यामुळे रुग्ण लवकरत बरा होणे, तसेच काही प्रमाणात मृत्यूचे प्रमाणही यामुळे कमी होऊ शकेल, अशी शक्यताही डॉ. खांडेकर यांनी व्यक्त केली.
विनाकारण आरटीपीसीआर करणे हे आयसीएमच्या विरोधात -
सध्याच्या काळात विनाकारण अनेकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. यात रुग्णाला कुठलेही लक्षण नसल्यास विणाकारण चाचणी करू नये. यामुळे ज्या टेस्टिंग लॅब आहे त्यांच्यावर विणाकारण ताण वाढतो. यामुळे विणाकारण टेस्ट करणे योग्य नाही. शिवाय हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे असल्याचेही ते म्हणतात. तसेच हे आयसीएमारच्या नियमांना धरून नाही, असेही डॉ. खांडेकर म्हणाले.