महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या मुन्ना उर्फ अनिल पांडे यांचा सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे

By

Published : Jun 17, 2019, 6:34 PM IST

वर्धा - सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मुन्ना उर्फ अनिल हिरालाल पांडे (५१) यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. प्राथमिक उपचारानंतर कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू


पोलीस कर्मचारी मुन्ना उर्फ अनिल पांडे हे मागील तीन वर्षांपासून सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत होते. सोमवारी सकाळी एका गुन्ह्यातील आरोपीची मेडिकल तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. दरम्यान पोलीस कर्मचारी पांडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सुद्धा डॉक्टरकडून रक्तदाब तपासून घेतला. त्यात रक्तदाबवाढल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तिथेच डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेतला आणि परत कर्त्यव्यावर रुजू झाले. त्यांनतर आरोपीला सेलू येथील न्यायालयात पेशीसाठी घेऊन जायचे होते. यावेळी पांडेंनी पोलीस ठाण्यातच जेवण केले. त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास पांडेना छातीत दुखायला लागले. श्वास घ्यायला अडचण होत असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र हृदय विकाराच्या झटक्याने पांडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


पांडे यांच्या निधनाने पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण पसरले. कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. मुन्ना पांडे हे वर्धा येथे राहत असून त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details