वर्धा- पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस काका आणि पोलीस दीदी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. वर्ध्याच्या पोलीस मुख्यालयातील आशीर्वाद मंगल कार्यालयात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी या पोलीस काका आणि पोलीस दीदी या फलकाचे अनावरण करत घोषणा केली.
माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली लहान मुले तसेच शाळकरी विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार रॅगिंग, छेडछाड, अशा गुन्ह्याला आळा घालण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली.
हेही वाचा - एक भारत श्रेष्ठ भारत: वर्ध्यात जेवणोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा
प्रत्यके शाळेत एक पोलीस पुरुष कर्मचारी म्हणजेच पोलीस काका किंवा महिला कर्मचारी म्हणजेच पोलीस दिदी, अशी नियुक्ती करण्यात येणार आहे. जे नेहमी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील. कोणालाही काही त्रास झाल्यास यांच्या क्रमांकावर संपर्क करतील आणि माहिती देतील. यामुले लहान मुले व विद्यार्थ्यांविषयीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होईल, अशी माहिती अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
हेही वाचा - शिवभोजन थाळीच्या माध्यमातून फूड सिक्युरिटी अॅक्टची आठवण
यावेळी, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, पियुष जगताप, तृप्ती जाधव, तसेच पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, निलेश ब्राह्मणे, योगेश पारधी, कांचन पांडे, रेवचंद सिंगंजुडे यांसह शहरातील विविध शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा - पैशाच्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर