वर्धा - शहरात बंद घरांना सावज करत चोरीचे प्रकार सुरू होते. मात्र, आता वर्धा पोलिसांना चोरट्याना जेरबंद करण्यात यश आले आहे. रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० घरफोड्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे. त्याच्याकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्ध्यात घरफोडी करणारे आरोपी जेरबंद, साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - वर्धा बातमी
वर्ध्यातील कृष्ण नगर, राधा कॉलनी, पिपरी मेघे पद्मावती नगर, शिक्षक कॉलनी आणि नालवाडी या परिसरातील नागरिक बाहेरगावी गेल्यावर हे चोरटे घरात शिरून हात साफ करत होते. सामूहिकरित्या त्या परिसरात जाऊन पाळत ठेवायचे. घरात रात्री कोणीच नाही हे माहीत झाल्यावर त्या घरात चोरी करत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.
वर्ध्यातील कृष्ण नगर, राधा कॉलनी, पिपरी मेघे पद्मावती नगर, शिक्षक कॉलनी आणि नालवाडी या परिसरातील नागरिक बाहेरगावी गेल्यावर हे चोरटे घरात शिरून हात साफ करत होते. सामूहिकरित्या त्या परिसरात जाऊन पाळत ठेवायचे. घरात रात्री कोणीच नाही हे माहीत झाल्यावर त्या घरात चोरी करत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. राजू राम दांडेकर आणि रामू देविदास मुळे, मारोती राम लष्कर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
चोरट्यांकडून कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या असे 100 ग्राम सोन्याचे दागिने, तर कमरपट्टा, पैंजण, वाटी ग्लास चम्मचा आदी 600 ग्राम चांदीचे साहित्य आणि साडेचार हजार रोख असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारताला दिली. ही कारवाई ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे एएसआय शंकर भलावी, संतोष कुकुडकर, निलेश करडे, धर्मेंद्र अकाली यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे.