वर्धा- वर्धा ते हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येथील शिवार ढाब्यासमोर रात्री ट्रकचालकाची चोरट्याने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याला हत्येच्या गुन्ह्यात १० तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. रमेशकुमार नरसिंग यादव (वय ३६) असे मृताचे नाव असून ते उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या चोरास वर्ध्यातून अटक - truck driver
चोरट्याने ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून पैसे शोधण्यास सुरूवात केली. त्यावेळी अचानक रमेशकुमार यांना जाग आली. त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने रमेशच्या छातीवर, पोटावर आणि हातावर चाकूचे घाव घातले
चोरट्याने ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून पैसे शोधण्यास सुरूवात केली. त्यावेळी अचानक रमेशकुमार यांना जाग आली. त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने रमेशच्या छातीवर, पोटावर आणि हातावर चाकूचे घाव घातले. रमेश जखमी अवस्थेत ट्रकमधून खाली उतरले आणि जवळच्या ट्रकचालकाला मदतीस हाक दिली. यावेळी बलवंतसिंग यांना जाग आली, त्यांनी अल्लीपूर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. परंतु, रक्तस्त्राव अधिक झाल्याने रमेशचा मृत्यू झाला.
गुन्हेगाराने ही हत्या पैसे चोरण्याच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर यांनी केली आहे.