वर्धा- आर्वी नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये सुरू असलेले बांधकाम अवैध असल्याची तक्रार मुख्याधिकारी यांनी आर्वी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी दुकानदारांना पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. दुकानदारांना पोलीस ठाण्यात नेल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शहरातील दुकान बंद करून निषेध नोंदवला.
7 व्यापारी पोलिसांच्या ताब्यात हेही वाचा - समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांना घातपाताचा संशय
सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये 7 दुकान मालकांनी बांधकाम करण्याची परवानगी नगर परिषदेकडे मागितली होती. तेव्हा परवानगी मागून 2 महिने उलटूनही परवानगी देण्यात आली नाही. तसेच बांधकाम मंजुरीसाठी दुकान मालक दंड भरण्यासाठी तयार असतानाही हे बांधकाम अवैध असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी बांधकाम पाडा, अन्यथा तोडू असे सांगत 12 नोव्हेंबरची मुदत दिली. मात्र, मुदत दिली असतानाच पोलिसांत तक्रारही दिली.
हेही वाचा -दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू
याच तक्रारीच्या आधार घेत पोलिसांनी दुकान मालकांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी व्यापाऱ्यांनी निषेध करत शहरातील दुकाने बंद ठेवली. तर मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी 12 नोव्हेंबरला बांधकाम पाडा, अन्यथा पाडू अशी नोटीस दिली असताना पोलिसांत तक्रार का दिली? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच यासाठी मुख्याधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकला आहे का? हे पाहणे महत्वाचे आहे. तसचे दुकान मालकांवर केलेली कारवाई ही सुद्धा राजकीय दबावातून केली असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे.