महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा - पालकमंत्री सुनिल केदार - वर्धा पालकमंत्री सुनिल केदार

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करण्याचा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्या आहेत.

Guardian Minister Sunil Kedar
Guardian Minister Sunil Kedar

By

Published : May 9, 2021, 12:42 AM IST

वर्धा - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करण्याचा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्या आहेत. आगामी लाटेचा विचार करून साधनांची आवश्यकता तपासून आराखडा सादर करावा, जेणेकरून पूर्व तयारी करता येईल, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

ऑक्सिजन प्लांट उभारावे, गरज पडल्यास पर्यायी व्यवस्था करावी -

सेवाग्राम रुग्णालयाने भविष्यातील कोरोना परिस्थिती पाहता ऑक्सिजनची तुटवडा होऊ नये यासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्यात. राज्य शासनाच्यावतीने यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगितले. आणीबाणीच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन गरज पडल्यास सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयांनी जम्बो ऑक्सिजन सिलिंडर राखीव स्वरुपात ठेवावे. सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयास लिक्वीड ऑक्सिजनचे टँकर प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येईल असेही ते पालकमंत्री केंदार म्हणालेत.

ग्रामीण भागात यंत्रणेने रुग्ण सुविधेसाठी तत्पर राहावे -


ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना प्रसार थांबविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील यांची समिती गठीत करुन कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करावे. त्यांना गृह विलगीरणात राहण्यास सांगावे. तसेच वेळेवेळी रुग्णाचे ऑक्सिजन व तापमान तपासावे. गृहविलगीकरणातील व्यक्तीचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास ताबडतोड रुग्णालयात दाखल करावे.

ABOUT THE AUTHOR

...view details