महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Physical abused on minor : नराधमाचा तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार; वर्ध्यातील संतापजनक प्रकार - अल्पवयीनवर अत्याचार गिरड पोलीस ठाणे

लोखंडी पीपे तयार करणाऱ्या एका नराधमाने कारागिराने तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ( Physical abused on minor ) जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस स्टेशन ( Girad Police Station ) अंतर्गत हा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Physical abused on three minor girl wardha
नराधमाचा तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार

By

Published : Feb 20, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 20, 2022, 5:03 PM IST

वर्धा - लोखंडी पीपे तयार करणाऱ्या एका नराधमाने कारागिराने तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ( Physical abused on minor ) जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस स्टेशन ( Girad Police Station ) अंतर्गत हा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (केशव बावसू वानखेडे (५६) रा. माकुना सावळी, ता. चिमूर जि. चंद्रपूर) असे विकृत नराधमाचे नाव आहे.

तिसऱ्या मुलीवरही बलात्कार -

केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असून खेड्यापाड्यात जाऊन तो तो लोखंडी पिपे तयार करून विकण्याचा व्यवसाया करतो. याच कामानिमित्त तो गिरड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकत होता. सायंकाळी त्याची विकृत नाराधमाची नजर दोन सख्ख्या बहिणींवर पडली. ज्यांचे वय साधारण पाच ते सहा वर्ष होते. त्याने अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत रस्त्याकडेला असलेल्या एका ओसाड भागातील पडक्या बाथरुममध्ये नेले. तिथे त्या नराधमाने अंधाराचा फायदा घेत दोघीचे लैंगिक शाेषण केले. तो नराधम ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखी एक सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा -Tragic accident in Kota : चंबळ नदीत कार कोसळली, वरासह 9 जणांचा मृत्यू, सीएम गेहलोत यांनी व्यक्त केला शोक

दोन्ही बहिणींनी हा संतापजनक प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला असता प्रकार उजेडात आला. पीडित मुलींच्या पालकांनी गिरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याननंतर तिसऱ्या चिमुकलीवर सुद्धा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आराेपी केशव बावसू वानखेडे अटक करत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षण यांच्याकडे दिला असून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी यांनीही याकडे लक्ष घातले आहे.

Last Updated : Feb 20, 2022, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details