महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात ६ वर्षाच्या चिमुकलीवर युवकाचा अत्याचार, आरोपी गजाआड - अत्याचार

वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात एका युवकाने ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घराशेजारी राहणारी चिमुकली दुपारच्या वेळी खेळत असताना आरोपीने तिला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

Wardha

By

Published : Mar 10, 2019, 11:33 AM IST

वर्धा- वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्याभागात एका युवकाने ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घराशेजारी राहणारी चिमुकली दुपारच्या वेळी खेळत असताना आरोपीने तिला घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घराशेजारी राहणाऱ्या २० वर्षांच्या युवकाने हे कृत्य केल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपी तरुणाने चिमुकलीला याबाबत कोणाला सांगितले, तर जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती ठाणेदार आशिष गजभिये यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details