महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्याने' तब्बल 23 वेळा केला ई- पाससाठी अर्ज, प्रशासनाने गुन्हा दाखल करत केले क्वारंटाईन - वर्धा कोरोना अपडेट्स

या व्यक्तीने ई - पास काढून 3- 4 दिवस येणे जाणे केले. मात्र दोन दिवसांपूर्वी ई पासचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांना या व्यक्तीचे लागोपाठ दोन -तीन वेळा अर्ज दिसले. ही बाब निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यावर सदर व्यक्तीने केलेल्या मागील सर्व अर्जाची माहिती काढल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्यक्तीने मे आणि जून महिन्यात प्रवास करण्यासाठी तब्बल 23 वेळा अर्ज केल्याचे समोर आले.

wardha
'त्याने' तब्बल 23 वेळा केला ई- पाससाठी अर्ज

By

Published : May 31, 2020, 5:00 PM IST

वर्धा- लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी शासनाकडून अधिकृत पास घेणे गरजेचे आहे. पण एकाने या पाससाठी चक्क 23 वेळा अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या लक्षात ही बाब आली. यामुळे त्या व्यक्तीवर रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.


अडकलेल्या लोकांना सुविधा म्हणून ई- पास सुरू करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या कक्षात 9 जण दोन पाळीत काम करतात. या अत्यावश्यक सेवेचा वर्ध्याच्या केशवसिटी भागात राहणाऱ्या मनीष नामक व्यक्तीने गैरफायदा घेतला असल्याचे पुढे आले आहे.

या व्यक्तीने ई - पास काढून त्याने 3- 4 दिवस येणे जाणे केले. मात्र दोन दिवसांपूर्वी ई पासचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांना या व्यक्तीचे लागोपाठ दोन -तीन वेळा अर्ज दिसले. ही बाब निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यावर सदर व्यक्तीने केलेल्या मागील सर्व अर्जाची माहिती काढल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्यक्तीने मे आणि जून महिन्यात प्रवास करण्यासाठी तब्बल 23 वेळा अर्ज केल्याचे समोर आले. 4 वेळा त्याची पास मंजूर झाली तर 10 वेळा त्याने केलेला अर्जाचा नंबर येईपर्यंत त्याची प्रवासाची तारीख निघून गेलेली होती. 6 वेळा त्याचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला, तर तीन अर्ज पेंडिंग असल्याचे सांगितले जात आहे. अशा पद्धतीने त्याने 23 वेळा अर्ज केले आहे.

त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी तहसीलदार वर्धा यांना सदर व्यक्तीची पोलीस तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तींविरुद्ध कलम 188 चा भंग केल्याची तक्रार केली. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला म्हसाळा येथे संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे गृह विलगिकरण करण्यात आल्याची माहिती ठाणेदार धनाजी जळक यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details