वर्धा- हिंगणघाट, देवळी, वर्धा तालुक्यातील कानगाव परिसरात जवळपास 14 गावात अचानक सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घाबरून नागरिक घराबाहेर पडले. जवळपास 70 सेकंद हे सौम्य धक्के जाणवले. 3 वाजून 16 मिनिटे 20 सेकंदावर 2.6 रिश्टर स्केलवर धक्के नोंदवण्यात आले. ही माहिती मोर्शी केंद्रावर नोंदवण्यात आली असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
कानगाव परिसरातील 14 गावात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये दहशत - भूकंप
हिंगणघाट तालुक्यासह वर्धा आणि देवळी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के नोंदवले आहेत. हे धक्के जाणवलेल्या गावात हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, मोझरी शेकापूर, डवलापूर, भय्यापूर, खानगाव, साती, रोहनखेड, कोसूर्ला, वरुड, नांदगाव, कात्री, चानकी, देवळी तालुक्यातील अंबोडा, पाथरी, वर्ध्यातील वायगाव या गावाचा समावेश आहे.
मोर्शी केंद्रापासून साधारण 120 किमीवर हे धक्के बसल्याचे माहिती सूत्रांनी दिली. ते हिंगणघाट तालुक्यासह वर्धा आणि देवळी तालुक्यात नोंदवले आहेत. हे धक्के जाणवलेल्या गावात हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, मोझरी शेकापूर, डवलापूर, भय्यापूर, खानगाव, साती, रोहनखेड, कोसूर्ला, वरुड, नांदगाव, कात्री, चानकी, देवळी तालुक्यातील अंबोडा, पाथरी, वर्ध्यातील वायगाव या गावाचा समावेश आहे.
काही घरातील भांडी जमिनीवर पडली. काही वेळ जमीन थरथरली. नागरिक निवांत असताना सौम्य हादरा बसल्याने घाबरून घराबाहेर पडले. यावेळी काही नागरिकांनी तलाठी आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. यामुळे काही घरातील भांडे पडले असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. नायब तहसीलदार समशेर पठाण, तलाठी अंबादे, मोजरीचे तलाठी मुंजेवार, आलमडोह तलाठी कोल्हे गावात अधिक माहिती घेत आहेत. भूकंपाच्या सौम्य धक्क्यात नुकसान नाही. वर्ध्यात काही भागात सौम्य धक्के जाणवले असून यामध्ये कुठलीही जीवित किंवा इतर हानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भूकंपाचे केंद्र अद्याप कळू शकले नाही. यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी केंद्राच्या रिश्टर स्केलवर 2.6 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेल्याने भूकंपाचे धक्के असल्याचे स्पष्ट झाले.