महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान - wardha

सेलू तालुक्यातील पळसगाव(बाई) या गावाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग आहे. यासाठी  करण्यात आलेल्या श्रमदानात ग्रामस्थांनी मोठ्ठा सहभाग दर्शवला होता. महत्वाचे म्हणजे, या श्रमदानात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग दाखवत श्रमदान केले.

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान

By

Published : May 11, 2019, 11:27 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पळसगाव(बाई) या गावाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग आहे. यासाठी करण्यात आलेल्या श्रमदानात ग्रामस्थांनी मोठ्ठा सहभाग दर्शवला होता. महत्वाचे म्हणजे, या श्रमदानात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग दाखवत श्रमदान केले.

सत्यमेव जयते वॉटर कप: आमदार समीर कुणावर यांनी केलं श्रमदान


पळसगाव(बाई) ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी सकाळच्या सुमारास महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 800 मिटरच्या बांधी बांधल्या गेली. या बांधीमुळे तब्बल 40 लक्ष मीटरचा पाणी साठा होणार आहे. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्रमदानाला सुरुवात करण्यात आली होती.


पळसगावत 700 श्रमदात्यानी केले श्रमदान -
या महाश्रमदानात गावात आलेल्या मान्यवराची नोंद घेतली जाते. आज झालेल्या या महाश्रमदनाला पळसगावात आमदार समीर कुणावर यांनीही सहभाग घेत श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वय चंद्रशेखर डोईफोडे, आकाश बिसंदरे, तांत्रिक साहाय्य, ज्योसना नारनवरे यांनी आमदार कुणावर यांना कामाची माहिती दिली. तसेच महाश्रमदनाला बाहेर गावावरून डॉक्टर, वकील, शाळकरी, केसरीमल नगर विद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच गावकरी मिळून 700 लोकांनी सुध्दा महाश्रमदानात सहभाग घेतला होता.


गाव पाणीदार करण्यासाठी मिळाले आर्थिक मदत -
गावातील प्रणय दिलीपराव बोरकुटे यांच्या माध्यमातून हमदुले व पीको इंडस्ट्रीज पुणेच्या वतीने 70 हजार रुपये शेततळ्यासाठी देणगी म्हणून देण्यात आली. त्याचेसुध्दा भूमिपूजन डॉक्टर मधुकर कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.


दिव्यांग फैजलने केले श्रमदान...
दिव्यांग फैझल शेख नामक युवकाने सुध्दा श्रमदानात भाग घेत इतरांना प्रेरणा देण्याचे काम केले. श्रमदानाला लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी श्रमाचे मोल नसल्याचे सांगत त्याला कौतुक म्हणून मिळणारे पैसे त्याने पाणी फाऊंडेशनला दिले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details