महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात वृद्धाची चाकूने हत्या - Parag Dhobale

धारीचे पैसे मागायला गेले असता उधारीच्या पैसे न दिल्याने झालेल्या वादात एका ६० वर्षीय वृद्धाची चाकूने हत्या करण्यात आली.

उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात वृद्धाची चाकूने हत्या

By

Published : Aug 4, 2019, 6:35 AM IST

वर्धा- उधारीचे पैसे मागायला गेले असता उधारीच्या पैसे न दिल्याने झालेल्या वादात एका ६० वर्षीय वृद्धाची चाकूने हत्या करण्यात आली. ही घटना काल (शनिवारी) सायंकाळी उशीरा येसंबा गावात घडली. जखमीला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वसंता शिवदास थुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर बादल पाटील असे चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव आहे.

उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात वृद्धाची चाकूने हत्या

बादल पाटील हा दारू व्यवसायीक असून त्यांचावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. यामुळे ही उधारी दारूच्या पैश्याची तर नव्हती ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बादल सुनील पाटील हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह पाच मारेकरी होते. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सुत्रांनी दिली. सेवाग्राम पोलिसांकडून तक्रारदाराच्या तक्रारीवरून ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून सेवाग्राम पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय बोठे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून खुनाचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती 'ईटीव्ही भारत'ला बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details