महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा; शेतालगतच्या परिसरात आढळले मादी बिबट्यासह दोन पिल्ले - leopard found wardha news

वन विभागाने खबरदारी म्हणून त्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. याठिकाणी गस्त घालण्यासाठी वन रक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना या भागात जाण्यास मनाई केली आहे.

मादी बिबट्यासह दोन पिल्ले
मादी बिबट्यासह दोन पिल्ले

By

Published : Jun 23, 2021, 10:53 AM IST

Updated : Jun 23, 2021, 1:25 PM IST

वर्धा- कारंजा तालुक्यातील सेलगाव परिसरातील शेतातील माकडांना जंगलाच्या दिशेने हाकलून लावताना गावकऱ्यांना मादी बिबट दिसून आली. याच ठिकाणी बिबट्याचे दोन पिल्लेही दिसून आली. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने मागे फिरत ही माहिती वन विभागाला दिली आहे. हा बिबट्या वन कक्ष क्रमांकाच्या 121च्या हद्दीतील मादी बिबट असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावून नागरिकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत.

शेतालगतच्या परिसरात आढळले मादी बिबट्यासह दोन पिल्ले
बिबट आणि पिल्लं असल्याची माहिती पसरताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या गर्दीनंतर मादी बिबट तिथून निघून गेली. वन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून त्या भागाची पाहणी केली. गोट्याच्या गुफेत या मादी बिबट्याने दोन पिल्लांना जन्म दिला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. हे दोन पिल्ले 8 ते 10 दिवसाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.भागात ट्रॅप कॅमेरेवन विभागाने खबरदारी म्हणून त्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. याठिकाणी गस्त घालण्यासाठी वन रक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना या भागात जाण्यास मनाई केली आहे. मादा बिबट ही पिल्लं घेण्यासाठी येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर, क्षेत्र साह्यक डी. एल.खरबडे क्षेत्र वनरक्षक. वाय. परतेतकी उईके, बी. एस. डोबाले, ओंकार चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करत गस्त लावली आहे.
Last Updated : Jun 23, 2021, 1:25 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details