वर्धा -वर्ध्यातील बॅचरल रोडवर मॅर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीसाठी नववर्षाची पहाट दुर्दैवी ठरली. भरधाव कारच्या घडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आली. रौनक सबाने असे मृताचे नाव आहे. तसेच धडक देणारा कारचालक हा शहर ठाण्यातील पोलीस कर्मचारी असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून रामनगर पोलिसांनी आपल्या दलातील कर्मचाऱ्यालाच अटक केली.
CCTV : वर्ध्यात पोलिसाच्या भरधाव कारच्या धडकेत एकाच मृत्यू - वर्धा अपघात बातमी
पोलिसाने मॅर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला आपल्या भरधाव कारने उडवले. पोलीस कर्मचारी असलेल्या कार चालकाला अटक करण्यात आली असून हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
कारने भरधाव गतीने उडवल्यानंतर नियंत्रण सुटलेली कार विद्युत खांबाला जाऊन धडकली. यानंतर कार चालक पोलीस कर्मचाऱ्याने धडक दिल्यानंतर गाडीतून बाहेर निघून अपघातग्रस्त व्यक्ती जिवंत आहे की नाही, याची शहानिशा केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
रामनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत गुन्हा नोंदवला आहे. कार घटनास्थळावरून काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली आहे.