महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परवाना नसलेल्या बंदुकीची गोळी लागून मेव्हणी जखमी, जि.प. सदस्य अटकेत - रामनगर पोलीस

गावठी पिस्तुलात गोळ्या कशा भरतात हे दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटून वर्धा जि.प. सदस्य उमेश जिंदे यांच्या मेव्हणीला लागली. याप्रकरणी उमेश जिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उमेश जिंदे

By

Published : Nov 19, 2019, 9:30 AM IST

Updated : Nov 19, 2019, 10:09 AM IST

वर्धा- गावठी पिस्तुलात गोळ्या कशा भरतात हे दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटू वर्धा जि.प. सदस्य उमेश जिंदे यांच्या मेव्हणीला लागली. यात जिंदेच्या मेव्हणी निकिता डोईफोडे जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवार (17 नोव्हे.) रोजी घटली. या घटनेने वर्ध्यातील सिंदी (मेघे) परिसरातल्या गिट्टीफैल भागातील घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

माहिती देताना ठाणेदार


याबाबत सविस्तर वृत्त असे, जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे यांच्या घरी पाहुणचाराला मेव्हणी निकिता डोईफोडे या पती साई डोईफोडेंसह आल्या होत्या. सायंकाळी घरामध्ये उमेश जिंदे आणि त्यांच्या पत्नी रितू जिंदे या डोईफोडे दाम्पत्यांसह गप्पा मारत होते. यावेळी उमेश जिंदे हे त्यांच्या जवळील गावठी पिस्तूल घरातील लोकांना दाखवू लागले. यावेळी या पिस्तुलामध्ये गोळी कशी भरतात हेत दाखवत असताना अनावधानाने गोळी सुटून उमेश जिंदेंच्या मेव्हणी निकिताच्या हातातून पोटात शिरली. त्यानंतर निकितास जखमी अवस्थेत सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


ही घटना रविवारी रात्री घडली असल्याची चर्चा आहे. पण, या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. यात हे प्रकरण दवाखान्यातून तक्रार झाल्याशिवाय उपचार होणार नसल्याने पोलिसांत पोहोचल्याची दिवसभर चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे प्रकरणात नेमके पोलीस तक्रारीत जरी आज अनावधानाने ही घटना झाली असल्याचे म्हटले असले तरी याचा शोध पोलिसांनी घेतल्यास नक्की काहीतरी वेगळे चित्र बाहेर येण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पिस्तूल ही खेळण्याचे साधन नसून जर जीवावर बेतणार असेल तर यात हा दाखवण्यासारखा प्रकार होता का, अनवधानाने जरी झाला असला तरी विना परवाना गावठी पिस्तूल घरात ठेवणे याचे कारण काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. या प्रकरणी रितू जिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उमेश जिंदे यास अटक करण्यात आली आहे. जिंदेंच्या ताब्यात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदार धनाजी जनक यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा - प्रेमाचा संदेश द्या अन् मैत्रीचे नाते जोडा! पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळ्यातील उपक्रम

Last Updated : Nov 19, 2019, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details