महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धावत्या कंटेनरसमोर वन्यप्राणी आल्याने अपघात, चालकाचा मृत्यू - धावत्या कंटेनरसमोर वन्यप्राणी आल्याने अपघात

चालक  शेख जुलफेकार रहुल हक छत्तीसगड येथील राजनंदगाव येथून श्वानाचे खाद्य घेऊन मुंबईला जात होता. यावेळी नागपूर ते अमरावतीच्यामध्ये सत्याग्रही घाटाजवळ कंटेनरसमोर वन्यप्राणी आडवा आला. त्याला वाचण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजक ओलांडून उलटला.

accident at amravati nagpur highway
धावत्या कंटेनरसमोर वन्यप्राणी आल्याने अपघात, चालकाचा मृत्यू

By

Published : Dec 11, 2019, 9:19 PM IST

वर्धा -अमरावती-नागपूर महामार्गावर तळेगावजवळ सत्याग्रही घाटात बुधवारी पहाटेच्या ३ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सत्याग्रही घाटातून कंटेनर जात असताना वन्यप्राणी समोर आल्याने हा अपघात झाला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. शेख जुलफेकार रहुल हक (वय ३५), असे मृताचे नाव असून तो बिहारच्या चंपारण्य येथील रहिवासी आहे.

धावत्या कंटेनरसमोर वन्यप्राणी आल्याने अपघात, चालकाचा मृत्यू

चालक शेख जुलफेकार रहुल हक छत्तीसगड येथील राजनंदगाव येथून श्वानाचे खाद्य घेऊन मुंबईला जात होता. यावेळी नागपूर ते अमरावतीच्यामध्ये सत्याग्रही घाटाजवळ कंटेनरसमोर वन्यप्राणी आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजक ओलांडून उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. क्लीनर सद्दमा हुसेन आफताब आलम हा किरकोळ जखमी झाला. संबंधित घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री वाहतूक सुरळीत झाली.

हे वाचलं का? - साताऱ्यातील 'त्या' काळरात्रीला आज 52 वर्षे पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details