वर्धा - जिल्ह्यात मागील 15 दिवसात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. अँटीजेन टेस्टवर एक कोटीच्या घरात खर्च झाला आहे. यापुढे आता अँटीजेन टेस्ट लक्षणे किंवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास केली जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20 हजार अँटीजेन किट आल्यापासून 13 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे.
मंगळवारी जिल्ह्यात 151 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून दोन हजाराच्या घरात रुग्णसंख्या जाऊन पोहचली आहे. एकूण 1,926 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोनाने जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा शिरकाव केला आहे. जिल्ह्यात 12,967 अँटीजेन टेस्ट विविध तालुक्यात करण्यात आल्या. यापैकी 1037 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 10 हजार किटची किंमत 50 लाख आहे. जिल्ह्यात 20 हजार किट मागवण्यात आले असून 20 हजार किट आरोग्य यंत्रणेकडून वाटप करण्यात आले आहेत. 13 हजार किटच्या साह्याने चाचणी झाली असून यात 7 हजार किट आरोग्य यंत्रणेकडे शिल्लक आहेत.
स्वॅब टेस्टवरचा खर्च कमी झाला आहे. 700 ते 1000 रुपयापर्यंत या चाचणीला खर्च येतो. पीपीई किटच्या दरांमध्येही घसरण झाल्याने या खर्चात घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात अँटीजन टेस्ट बोगस असल्याची अफवा सुरुवातीच्या काळात होती. यामुळे मोठा गैरसमज असल्याचे सांगितले जात आहे. 13 हजार पैकी केवळ 1 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात 12 हजार लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.