वर्धा - जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असून एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील चार दिवसांपासून सतत कोरोनाचे रुग्ण बरे होत असून आतापर्यंत 25 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, सध्या 17 रुग्ण उपचार घेत असून तेही लवकरच बरे होऊन घरी जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
वर्ध्यात आज एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, तर एकजण कोरोनामुक्त - वर्धा कोरोना केसेस बातमी
जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधिताची भर पडली असून एका जणाला बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 42 झाली आहे. तर, आज एक कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने कोरोनामुक्त लोकांची संख्या 25 झाली असून सध्या 17 रुग्ण हे उपचार घेत आहेत.
पवनी तालुक्यातील 29 वर्षीय तरुण 23 मे ला दत्तवाडी, जिल्हा नागपूरवरून आला होता. या तरुणाचे घशाचे नमुने तपासणीला पाठविले असता त्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे. तर, आज एक कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याने कोरोनामुक्त लोकांची संख्या 25 झाली आहे. सध्या 17 रुग्ण हे उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा संख्येत होणाऱ्या वाढीचे प्रमाण आता कमी झाले आहे.
आतापर्यंत 2 हजार 394 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 42 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 248 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 104 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज 8 जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 28 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 355 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोव्हीड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 171 जण भरती आहेत. 1 हजार 890 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40 हजार 710 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 30 हजार 85 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.