वर्धा - सेलू तालुक्यातील न्यू बोरच्या २८३ नंबरच्या कक्षात अस्वलाच्या शावकाचे अवशेष दिसून आले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अस्वलाच्या या शावकाची जंगली कुत्र्यांनी शिकार केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वर्ध्यात अस्वलाच्या शावकाचा जंगली कुत्र्यांनी पाडला फडशा
वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात अस्वलाच्या शावकाचा जंगली कुत्र्यांनी फडशा पाडला आहे.
अस्वलाचे हे शावक मादी असून ती ४ ते ५ महिन्याची असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच जंगलातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देत पंचनामा केला.
व्याघ्र प्रकल्पातील तलावात हे शावक पाण्याचा शोधात आले असावे. मात्र, यावेळी जंगली कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला असेल आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेवरून जंगलातील वन्यप्राणी किती सुरक्षित आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.