वर्धा- सध्या सर्वत्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कार्यक्रम, उत्सवावर निर्बंध आले आहे. अशा स्थितीत घरात राहून का होईना, वर्धेकरांनी रामनवमी साजरी केली. रामनवमीला वर्ध्याच्या रामनगर येथील आजोबांनी तब्बल दोन तास बसून रांगोळी काढली. राम लक्ष्मण सीता एका नावेतून जात असतानाचे हुबेहूब चित्र रांगोळीच्या रंगातून साकारले. यासह घरापुढे दिवे लावून रामनवमी साजरी केली.
वयाच्या सत्तरीत रांगोळी काढून रामनवमी साजरी - दिव्यांची आरास मांडत रामजन्मोत्सव साजरा
रामनवमीला वर्ध्याच्या रामनगर येथील आजोबांनी तब्बल दोन तास बसून रांगोळी काढली. राम लक्ष्मण सीता एका नावेतून जात असतानाचे हुबेहूब चित्र रांगोळीच्या रंगातून साकारले. यासह घरापुढे दिवे लावून रामनवमी साजरी केली.

विजयराव निनावे असे रांगोळी साकारणाऱ्या या 70 वर्षीय आजोबांचे नाव आहे. सध्या कोरोनमुळे लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दुपारचे दोन वाजताच लोकं घरात लॉकडाऊन करून घेतात. या काळात अनेक कार्यक्रम रद्द झाले आहे. त्याला रामनवमीही अपवाद राहिली नाही. पण मोठा उत्सव टाळून रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी घरापुढे दिव्यांची रोषणाई करत आनंद साजरा केला. काहींनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
रामनगर येथील विजय निनावे यांनी दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान राम लक्ष्मण सीता यांच्या प्रतिकृती एका चित्रातून रांगोळीच्या माध्यमातून साकारली. रांगोळी आणि चित्र काढण्याची त्यांना आवड आहेच. कोरोनाच्या निमित्याने घरात राहून आपला छंद जोपासत त्यांनी आज रामनवमी साजरी केली. यात रांगोळीच्या बाजूने दिव्यांची आरास मांडल्याने रांगोळी उठून दिसत होती.