महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट प्रकरण : दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष नोंद

हिंगणघाट जळीतकांड खटल्यात मंगळवारी (दि. 12 जाने.) दुसऱ्या दिवशी कामकाज झाले. यात हिंगणघाट येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात एकाची साक्ष नोंदवण्यात आली. तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 13 जाने.) पीडितेच्या वडिलांची आरोपी पक्षाकडून उलटतपासणी होणार आहे.

हिंगणघाट न्यायालय
हिंगणघाट न्यायालय

By

Published : Jan 12, 2021, 8:34 PM IST

वर्धा- राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या वर्ध्याच्या हिंगणघाट येथील प्रध्यपिकेच्या जळीतकांड खटल्यात मंगळवारी (दि. 12 जाने.) दुसऱ्या दिवशी कामकाज झाले. यात हिंगणघाट येथील जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात एकाची साक्ष नोंदवण्यात आली. तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 13 जाने.) पीडितेच्या वडिलांची आरोपी पक्षाकडून उलटतपासणी होणार आहे.

यावेळी खटल्याच्या कामकाजात दुसऱ्या दिवशी मृत पीडितेच्या वडिलांची फेरतपासणी केली गेली. आरोपीच्या वकिलांच्या उलट तपासणीस वेळ मागण्यात आला. आज (मंगळवार) न्यायालयाचे कामकाजाचा वेळ संपला. यामुळे बुधवारी (दि. 13 जाने.) सकाळचा वेळ उलट तपासणीसाठी दिला आहे. यानंतर आणखी काही साक्षीदाराची साक्ष होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी तीन, आज एक अशी चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. शासनाच्या वतीने अ‌ॅड. उज्ज्वल निकम तर आरोपीच्या वतीने अ‌ॅड. भुपेंद्र सोने यांनी बाजू मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details