वर्धा- विहिरीत पडलेल्या नीलगायीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यास समुद्रपूर तालुक्यातील गिरड गावातील गावकऱ्यांना यश आले आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेत २ तासांच्या अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांनी सुरक्षितरित्या नीलगायीला विहिरीबाहेर काढले.
वर्धा : विहिरीत पडलेल्या नीलगायीला सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश - वनविभाग
भटकेली नीलगाय शेत शिवारात फिरत असतांना कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. यात नीलगाय गावाच्या दिशेने धावत सुटली. एवढयात ही नीलगाय गावातील एका विहिरीत पडली.
नीलगाय मोठ्या प्रमाणत कळपाने राहते. परंतु, भटकेली नीलगाय शेत शिवारात फिरत असतांना कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. यात नीलगाय गावाच्या दिशेने धावत सुटली. एवढयात ही नीलगाय गावातील एका विहिरीत पडली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती वनविभागासह गिरड पोलिसांना देण्यात आली. काही वेळात घटनास्थळी पोलीस पोहचले. मात्र, या खोल विहिरीत उतरुन नीलगायीला बाहेर काढण्यास कोणीच तयार झाले नाही.
यामुळे वार्डातील अर्जुन वानोडे, तुकाराम ढोके, शंकर फोपारे, राहुल फोपारे यांच्यासह गावकऱ्यांनी नीलगायीला विहिरीतून बाहेर काढले. वनविभागाने नीलगायीला ताब्यात घेऊन खुर्सापार जंगलात सुरक्षित सोडले आहे.