महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारचा विरोध; वर्ध्यात शेतकऱ्यांचे रस्त्यावर 'निद्रा' आंदोलन - kisan adhikar abhiyan

वर्धा-नागपूर मार्गावरील आमगाव फाट्यावर आंदोलन करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपून केंद्र सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला.

nidra andolan by kisan adhikar abhiyan wardha
केंद्र सरकारचा विरोध; वर्ध्यात शेतकऱ्यांचे रस्त्यावर 'निद्रा' आंदोलन

By

Published : Dec 5, 2020, 3:45 PM IST

Updated : Dec 5, 2020, 5:00 PM IST

वर्धा - कडाक्याच्या थंडीत हरयाणा आणि पंजाब राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात लढा देत आहे. या आंदोलनाचे समर्थन करत सेलू तालुक्यातील आमगाव येथेही निद्रा आंदोलन करण्यात आले. किसान अधिकार अभियानच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनस्थळाची दृश्ये.

रस्त्यावर झोपून केला संताप व्यक्त..

वर्धा-नागपूर मार्गावरील आमगाव फाट्यावर आंदोलन करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपून केंद्र सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द न केल्यास किसान अधिकार अभियानाच्यावतीने देशातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी दिला.

या गावातील शेतकरी झाले सहभागी..

आंदोलनात सिंदी, नवरगाव, दहेगाव, खापरी, घोराड अशा विविध गावातून शेतकरी उपस्थित होते आहे. किसान अधिकार अभियानचे प्रफुल कुकडे, विठ्ठल झाडे, प्रशांत बोरीकर,प्रवीण पोकळे, बालु सोनटक्के, सुनिल लोनकर, ईमरान सैय्यद, समाधान पवार, अंबादास जाधव, सचीन लामसोगे गोपाळ दुधानेही या आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांचे ऐकणार का? आजच्या पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात

Last Updated : Dec 5, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details