वर्धा -लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध 8 मे ला लागू होणार असून 13 पर्यंत कडक निर्बंध असणार आहे. याकाळात वैद्यकीय सेवाच सुरु राहणार आहे. यासोबत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वर्ध्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस कडक निर्बंध - वर्धा लेटेस्ट न्यूज
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे सकाळी 7 वाजल्यापासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
वर्ध्यात कडक निर्बंध लागू