महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात वृतपत्र विक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू

समुद्रपूर तालुक्याच्या कोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली असून जनार्धन ननावरे, असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

मृत जनार्धन ननावरे

By

Published : May 26, 2019, 8:20 AM IST

वर्धा- समुद्रपूर तालुक्याच्या कोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. जनार्धन नंदकुमार ननावरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जनार्धन ननावरे यांच्या घारासमोरील दृश्य

जनार्धन ननावरे हे वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने ते सकाळी वर्तमानपत्र वितरणाचे काम अनेक वर्षांपासून करत होते. रोजमजुरी करून ते कुटुंबाची उपजिवीका भागवत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाटल्यानंतर भर उन्हात ते खताचे पोते उतरविण्याचे काम करीत होते. उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यांनांतर कुटुंबीयांनी त्यांना नांदोरी येथील रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी जनार्धन यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता

ABOUT THE AUTHOR

...view details