वर्धा - दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले होते. मागील 6 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आज (शनिवार) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 2 रुग्ण आढळले. यात आर्वी तालुक्यातील एक 52 वर्षीय आहे. तर सिंदी रेल्वे येथील एक रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे.
आर्वी तालुक्यातील वर्धामनेरी येथील पुरुष (वय, 52) कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 10 झाली असून अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 2 आहेत. यापैकी एका रुगणांवर सिकंदराबाद येथे उपचार सुरू आहेत.
सदर व्यक्तीचा मुलगा दिल्लीला युपीएससी परीक्षा तयारीसाठी राहत होता. तो 19 मे रोजी दिल्लीवरून परत वर्धमनेरी येथे आला. तसेच मुलगी 1 महिन्यापूर्वी नागपूरहून परत आली होती. त्यानंतर पूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात होते. त्यांचा गृह विलागीकरण कालावधी 1 जून रोजी समाप्त झाला. कोरोनाबाधित व्यक्तीला ताप, खोकला, आणि पचनाचा त्रास जाणवत होता. 4 तारखेला सदर व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीला पाठवण्यात आला होता. आज प्राप्त अहवालात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निकट संपर्कातील 3 व्यक्तींना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले.
वर्ध्यात दोन नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद, एकावर सेवाग्राममध्ये तर दुसऱ्यावर नागपुरात उपचार सुरू - वर्धा कोरोना अपटेड
दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले होते. मागील 6 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आज (शनिवार) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 2 रुग्ण आढळले.
सिंदी रेल्वे येथील रेल्वे कर्मचारी निघाला कोरोनाबाधित
सिंदी रेल्वे येथील रेल्वे कर्मचाऱ्याचा (वय 59) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाची प्रकृती 31 मे पासून बरी नव्हती. त्यांनी स्थानिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालायत उपचार घेतले. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते मालगाडीने शुक्रवारी 5 जून रोजी नागपूर येथे गेले. यावेळी रेल्वेच्या रुग्णालयात उपचार घेतले. यानंतर त्यांना मेयोमध्ये दाखल करून त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीला पाठवण्यात आला होते. त्याचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येत आहे.