वर्धा - आर्वी आणि वर्धा येथील दोन महिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यात एक 36 वर्षीय आणि दुसरी 57 वर्षीय महिला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 32 जणांना विलगीकरणात ठेवले आहे.
वर्धा: एकाच दिवशी दोन महिला कोरोनाबाधित; 32 जण विलगीकरणात - containment zones in wardha
कोरोना बाधित महिलांच्या संपर्कात आलेल्या 32 व्यक्तींचे स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना आर्वी उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोरोना बाधित महिलांच्या संपर्कात आलेल्या 32 व्यक्तींचे स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना आर्वी उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच कमी जोखमीच्या 52 व्यक्तींना कोविड केअर सेंटरला विलगीकरणात ठेवले आहे. जिल्ह्यात एकूण 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 6 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील आठवड्यापासून रुग्णससंख्येत वाढ झाली आहे.
आर्वीतील महिला 11 जूनला पुण्यातील थेरगाव येथे लग्नासाठी गेली होती. ही महिला 25 जूनला पुण्याहून परत आली होती. तर 26 जूनला महिला घरी विलगीकरणात होती. त्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालायत कोरोनाच्या उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
गुरुवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीची आईसुद्धा कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. त्यांनाही सेवाग्राम येथे भरती करण्यात आले आहे. आर्वी येथे अगोदरच प्रतिबंधित क्षेत्र असताना महिला कृषी सहाय्यक त्याच भागातील आहे. त्यामुळे तेथील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ झाली आहे. जुवाडीमधील आणखी काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी आदेश काढून जाहीर केला आहे.
जिल्ह्यात 4 हजार 634 जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 4 हजार 549 जणांच्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर 19 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तर 47 कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात 55 हजार लोक घरात विलगीकरणात राहिले आहेत. त्यापैकी 6 हजार 205 व्यक्ती सध्या घरात विलगीकरणात आहेत. तर कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 153 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. जिल्ह्यात 4 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.